Anil Shidore अनिल शिदोरे Profile Banner
Anil Shidore अनिल शिदोरे Profile
Anil Shidore अनिल शिदोरे

@anilshidore

Followers
60,316
Following
99
Media
1,551
Statuses
19,636

नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI

Pune, Maharashtra
Joined November 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
नुकताच आजोबा झालो.. ही माझी नात “आनंदी” ...
Tweet media one
207
71
5K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
तुम्हाला त्यांची मतं पटोत, न पटोत @UrmilaMatondkar ह्यांची @abpmajhatv वरची सहज मुलाखत पहाताना वाटलं महाराष्ट्राची सुसंस्कृत अभिजनता काही विलक्षणच आहे.. संपन्न मराठी परंपरेची हलकीशी झलक त्यांच्या मुलाखतीतून जाणवली.
69
276
3K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
पेट्रोल ११२ आणि डिझेल १०३ रूपये लीटर होईल ह्याची कधी कल्पनाच केली नव्हती. परंतु, त्याचबरोबर किंमती कितीही भरमसाठ वाढल्या तरीही लोक प्रश्न विचारणार नाहीत किंवा रागावणार नाहीत, ह्याचीही कधी कल्पना केली नव्हती.
111
458
3K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
अमेझॅान ला मराठी ला मानावं लागलं ही लढाई तर आपण जिंकली.. त्याबद्दल महाराष्ट्र सैनिकांचं मन:पूर्वक अभिनंदन.. आता त्याचा - तिथल्या मराठी पर्यायाचा - वापर करण्याची जबाबदारी समस्त मराठी माणसाची.. जय महाराष्ट्र !
40
185
3K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
मुंबईवरून गुजरात आणि महाराष्ट्राचा झगडा सर्वांना माहीत आहे.. त्यात ज्या दिवशी मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्याच दिवशीचा मुहूर्त साधून मुंबईतलं आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला हलवलं गेलं.. मराठी माणूस ही घटना, त्यामागची माणसं आणि त्यामुळे भळभळलेली जखम कधीही विसरणार नाही..
88
319
3K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
मा. राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Tweet media one
36
95
3K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना विनंती की ज्ञानाच्या क्षेत्रात जगात अदभुत गोष्टी घडत असतात. जसं की जेम्स वेब्ब दुर्बिणीनं विश्वाच्या एका टोकाची काढलेली छायाचित्रं.. अशांचंही वृत्तांकन मराठीत यावं.. किती दिवस आपण फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, आलेले खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
77
238
3K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
सुप्रभात ! आज सकाळी चुकून वृत्तपत्र असावं असं समजून ५ रूपये देऊन मी ८२ पानांच्या जाहिराती विकत घेतल्या.
67
91
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
२७ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रात्री किल्लारी (लातूरजवळ) ला भूकंप झाला. भूकंप झाल्या झाल्या काही तासांतच लातूरला पोचलो ते नंतर पुनर्वसनाचं काम पूर्ण होईपर्यंत दोन-सव्वादोन वर्ष होतो.. अगदी प्रेतं काढण्यापासून घरं बांधून लोकांच्या ताब्यात देण्यापर्यंत.. खूप शिकलो. आज आठवण आली.
33
128
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचं असतं तर त्यांनी प्राधान्यानं महारा��्ट्राचा विचार केला असता. आज महाराष्ट्रानं प्रयत्न करूनही त्यांनी कर्नाटकचा विचार केला.. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे..
74
222
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
त्याच त्याच पक्षाच्या त्याच त्याच लोकांना पुन्हा पुन्हा मतं देऊन काय मिळालं आपल्याला? पुणे पदवीधर मतदारसंघात रूपाली पाटील-ठोंबरे ह्यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नवा रस्ता दाखवला आहे आणि उत्तम संधी दिली आहे.. त्याचं सोनं करा.. जय महाराष्ट्र !
Tweet media one
24
133
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
आपण वर्षानुवर्ष पाहिलं की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारनं माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल.. सरकारनं माघार घेऊ नये.
169
285
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
केरळमध्ये गेल्या २४ तासात एकही कोरोनाबाधीत रूग्ण सापडला नाही.. अभिनंदन केरळ ! @CMOKerala
27
107
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
चार इंग्रजी पुस्तकं चाळली, थोडं परदेशाचं वारं लागलं की जिथे अभिजनवर्गाला मराठीत बोलायला कमीपणा वाटतो तिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान क्षेत्रात काम करूनही आपल्या मातृभाषेत सुंदर लेखन करणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले ही आनंदाची गोष्ट आहे..
16
180
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
या नाश्त्याला ! शेंगदाण्याची चटणी, ठेचा आणि भाकर .. रविवार #नाश्ता
Tweet media one
29
36
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
५७ सहकारी साखर कारखान्यांनी बॅंकांची देणी दिली नाहीत म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार ते पैसे (सुमारे ३,००० कोटी) देणार हे मनाला पटत नाही. ह्या कारखान्यांचे कारभारी कायमच सत्तेत राहिलेले आहेत.. त्यांना कारखाने नीट चालवता आले नाहीत म्हणून आपण का पैसे भरायचे? हे काय आक्रितच?
76
363
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारू घेतल्यानं ४० च्या वर मृत्यू होणं जरा अजबच आहे, नाही का?
61
126
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
ज्यांचे आई-बाप श्रीमंत आहेत ते आपली मुलं परदेशी शिकायला पाठवणार. ती मुलं आली की इथल्या लठ्ठ पगाराच्या जागा पटकावणार.. मग इथे आपल्या मातृभूमीत राहून उच्च शिक्षण घेतलं आहे अशांवर हा अन्याय नाही का? म्हणजे, श्रीमंत अधिक श्रीमंत होणार आणि गरीब आणखी गरीब.. हे कसं टाळायचं?
117
172
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
किती दिवस आपण पळत पळत जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात धन्यता मानणार? पूर येणारच नाही आणि आलाच तरी नुकसान कमीत कमी होईल असं नियोजन आपल्याला करता येणार नाही का?
71
166
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
1 year
पुण्यात हिंजवडी किंवा इतर आयटी पार्कमध्ये फार मोठ्या प्रमाणात नागपूर, अमरावती किंवा सांगली-कोल्हापूरकडची मुलं दिसतात. त्यांना कदाचित मुंबई-पुण्याचं आकर्षण असेलही पण #महाराष्ट्रआयटीधोरण म्हणून महाराष्ट्रातली इतर शहरंही रहाण्यासाठी तितकीच आकर्षक केली पाहिजेत, तरच राज्याचा विकास…
89
165
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
असं म्हणतात की "कोरोना" संकटाचा उत्तम मुकाबला ज्या देशांनी केला त्यात प्रामुख्यानं सहा देश येतात .. जर्मनी, न्यूझीलंड, बेल्जियम, फिनलॅण्ड, डेन्मार्क आणि आईसलॅण्ड.. आणि गमतीचा भाग म्हणजे त्या सर्व देशांचा कारभार, तिथलं नेतृत्व, महिलांकडे आहे.
49
165
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
राजीव सातव गेल्याची बातमी फार दु:खद आहे. २००६ ला “दुष्काळ हटवू, माणूस जगवू” ह्या आपल्या पदयात्रेत कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर सोबत चाललो होतो. शेतकऱ्यांच्या, दुष्काळाच्या प्रश्नांवर चालता चालता आम्ही खूप बोललो होतो. .. एक सुसंस्कृत राजकारणी अकाली गेला. श्रध्दांजली.
29
103
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
क्षण आनंदाचे #आनंदीक्षण
Tweet media one
26
24
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
10 months
अजित रानडे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू आहेत. त्यांनी विकसित देशाची तीन साधी, सोपी लक्षणं सांगितली आहेत. म्हटलं आहे : १) महानगरपालिकेच्या नळाचं पाणी डोळे मिटून पिता येणे. २) मुलांना घराजवळील महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणे, आणि ३) श्रीमंतांनी सार्वजनिक…
55
321
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
स्मार्टफोननी माझं एकाग्रचित्त (concentration), ध्यान (attention), विचारशक्ती आणि भाषा बिघडवली आहे. माझ्या वाचनाची आणि लेखनाची सवयही मोडली आहे. माझा मूळ स्वभावही हरवला गेला आहे. मी त्याच्या पकडीमधे आलो आहे असं वाटतंय.. सावरलं पाहिजे. स्मार्टफोनचा उपयोग मर्यादीत ठेवला पाहिजे.
52
134
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
फ्रेंच ओपनच्या चुरशीच्या सामन्यात विजयी झाल्यावर जोकोविचनं आपली रॅकेट एका छोट्या प्रेक्षकाला बहाल केली.. सांगितलं "तो मुलगा मला प्रोत्साहन तर देत होताच, पण काही युक्त्या पण सांगत होता".. मोठ्या खेळाडूचा मनाचा मोठेपणा .. सध्या अभावानं दिसणारा सार्वजनिक जीवनातला नम्रपणा, विनय..
8
101
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
ज्यांची पहिली भाषा मराठी आहे अशांची संख्या पाहिली तर जगात मराठीचा दहावा क्रमांक लागतो. (संदर्भ: भाषाकोश, SIL) .. ह्याच्याकडे आर्थिक दृष्टीनं पाहिलं तर लक्षात येईल की “मराठी” हे मार्केटही जगात लहान नाही. आपली फक्त एकजूट व्हायला हवी आणि आपण मराठीचा कडक आग्रह धरायला हवा.#मराठीगौरव
19
214
2K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं एक चांगली योजना जाहीर केली आहे. महानगरपालिकेनं नेमलेल्या केंद्रांवर जे पाच प्लॅस्टिकच्या बाटल्या आणून देतील त्यांना एक कप चहा दिला जाईल आणि दहा बाटल्यांमागे वडा-पाव!.. हे सारं प्लॅस्टिक कचरा हटवण्यासाठी! अभिनंदन, महानगरपालिकेचं अभिनव कल्पनेबद्दल!
24
116
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
केंद्र सरकारचे दोन निर्णय खटकतात.. १) राज्यं कोरोनाच्या बाबतीतलं संरक्षित साहित्य, मास्क वगैरे खरेदी करू शकत नाही.. आणि २) सीएसआरमधून फक्त "पीएम केअर्स" (पंतप्रधान निधी) लाच मदत करता येईल, मुख्यमंत्री निधीला नाही. प्रत्यक्षात "कोरोना"ची लढाई राज्यं लढत असताना इतकं केंद्रीकरण का?
55
260
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
टीआरपीच्या रस्सीखेचीत आपली मती भ्रष्ट करण्याचे उद्योग आपण ओळखले पाहिजेत.. ह्यात फक्त दूरचित्रवाणी वाहिन्या नाहीत तर वृत्तपत्रंही आहेत.. अशांवर जाहीरपणे बहिष्कार टाकणं हे एक शस्त्र मात्र “ग्राहक” म्हणून आपल्या हातात आहे.. मी रिपब्लिक दूरचित्रवाणी वाहिनीवर बहिष्कार टाकत आहे.
59
105
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
ॲपल कंपनीचं बाजारमूल्यं सुमारे २२५ लाख कोटी रूपयांचं झालं आहे. जे भारतातील वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. ह्याचं गमक कशात आहे माहीत आहे? त्यांनी गेल्या ५ वर्षात संशोधनावर आणि अभ्यासावर ६ लाख ९ हजार ६६५ कोटी रूपये खर्च केला.. अभ्यासाला पर्याय नाही मंडळी!
18
127
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
सांगलीमधल्या काही गावांत सायंकाळी ७ः०० वाजता सायरन वाजतो आणि नंतर एक तासभर गावात “डिजीटल ब्लॅकआऊट” पाळला जातो. टिव्ही, मोबाईल, संगणकाचे पडदे बंद.. मुलांचा अभ्यास व्हावा, एकाग्रचित्त व्हावं म्हणून सगळं गाव तसं करतं. उत्तम कल्पना..मलाही स्वतःसाठी असंच काही करावं वाटू लागलं आहे.
26
132
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
गांधीजींना खोडून काढता येत नाही आणि स्विकारताही येत नाही अशा एका विचित्र वळणापाशी येऊन आपण थांबलो आहोत..
46
86
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
Tweet media one
21
50
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
महावितरणने वीज दरात मोठी वाढ केली आहे. कालच गॅसही महागला आहे. आपली जीवनशैली अशी आहे की ह्या गोष्टी अगदी मुलभूत गरजेच्या आहेत. सर्वसामान्यांना महिन्याचा खर्च भागवणं अवघड होणार आहे.. दोन्ही सरकारांनी ह्यावर तातडीनं कृती करण्याची गरज आहे..
40
164
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
अविनाश साबळे ह्या मराठी खेळाडूनं राष्ट्रकुल स्पर्धेत ३००० मीटर्सच्या अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्य-पदक मिळवलं. आनंद झाला. त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. मराठी माणसाला रौप्यपदक मिळालं आणि ते बीड सारख्या शहरातून आलेल्याला मिळालं ह्याचा विशेष आनंद. सर्व प्रकारचं विकेंद्रीकरण महत्वाचं..
16
111
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार @PawarSpeaks ह्यांनी त्यांच्या "लोक माझे सांगाती.." ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढलं पाहिजे असं म्हटलं असल्याचं समजलं. मी पुस्तक वाचलेलं नाही पण हे खरं आहे का? @supriya_sule
52
161
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
१४ जानेवारी म्हटलं की पानिपत आठवतं.. महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्वाचा दिवस.. महाराष्ट्रानं कधीच विसरला नाही पाहिजे असा दिवस.
10
85
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
देशभरात आज एका दिवसात ५२९ रेल्वेगाड्या रद्द होणं ही छोटी गोष्ट नाही. शेतकरी संघटनाही हरियाना, पंजाबात आंदोलनात उतरलेल्या दिसतात.. हा निव्वळ “अग्निपथ” वरचा राग आहे की एकूण बेरोजगारीवरचा असंतोष?
36
127
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
महाराष्ट्रात अशी काही शहरं आहेत की जिथे १५-१५ दिवसात नळाला पाणी येत नाही तरीही तिथले मतदार त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच पक्षांना चार-चार, पाच-पाच निवडणुका निवडून देतात.. असं का होत असावं? ह्या निवडणुकीत तरी मतदार त्यांना धडा शिकवतील का?
92
155
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
फडणवीसांनी उगाच टीका करायची म्हणून करू नये .. तुमची सत्ता असलेल्या केंद्र सरकारनं सांगली-कोल्हापूरातील पूरग्रस्तांना किती मदत केली? अवकाळीग्रस्तांनाही काय मदत झाली? ह्याची उत्तरं द्यावीत.. @Dev_Fadnavis
23
199
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
मााझ्या महाराष्ट्रातल्या तरूण-तरूणी बेरोजगार असताना आणि नोकरीसाठी वणवण भटकत असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात काम करत होता? राज्यकारभारात आणि नियोजनात काहीतरी कुठेतरी मोठी गडबड झाली का? ज्या गफलतीकडे महाराष्ट्रानं आजवर दुर्लक्ष केलं?
95
157
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
5 years
ज्यांच्याशी आपण फोनवर बोललो आहोत आणि ज्यांचा फोन क्रमांक आपल्या फोनबुक मध्ये आहे अशा एखाद्या व्यक्तिला नोबेल सारखा पुरस्कार मिळाला की भरून येतं.. संदर्भ: अभिजित बॅनर्जी.
10
93
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
कितीही डिजीटल झालो तरी हातात वृत्तपत्र घेऊन वाचण्याची मजा आणि आकलन काही औरच ..
Tweet media one
13
39
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
एक छान वाक्य वाचलं, कुणाचं आहे माहीत नाही.. म्हटलं आहे, "धीर धरणं (पेशन्स) म्हणजे वाट पहाण्याची क्षमता नव्हे, तर वाट पहाताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची क्षमता" ..
15
103
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
1 year
बारसूजवळ जी कातळशिल्पं सापडली आहेत ती नेमक्या कुठल्या काळात कोरली गेली ह्याची शास्त्रीय निश्चिती अजून व्हायची आहे. परंतु ती अतिप्राचीन आहेत हे नक्की. ह्याचा अर्थ असा की कोकण आणि महाराष्ट्रात एक फार प्राचीन संस्कृती कदाचित विकसित झालेली होती. त्यामुळे ती संस्कृती काय होती, कशी…
31
154
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
दत्ता माझ्याबरोबर काम करतो. त्याला कुटुंबाला घेऊन दिवाळीसाठी गावी जायचं आहे. एसटी च्या बसेस पुरेशा नाहीत आणि खाजगी बसेस अव्वाच्यासव्वा भाडं आकारत आहेत.. जाणं परवडणार नाही म्हणतो.. सरकार खाजगी बसचालकांच्या नफेखोरीवर चाप लावणार का? @mieknathshinde @Dev_Fadnavis
56
107
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
जेंव्हा आमच्या मराठवाड्यासारख्या भागातल्या जिल्हा परिषद शाळेतली एखादी मुलगी ट्विटर किंवा गुगलची मुख्य कार्यकारी अधिकारी होईल तेंव्हा खरा आनंद.. #TwitterCEO
34
82
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
जरा आसपास पाहिलं तर जाणवतं की प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे काहींचे स्वभाव बदलले आहेत, सवयी बदलू लागल्या आहेत. कुणाची स्थिरता गेली तर कुणाची विचारशक्ती. काहींनी एकाग्रतेची सवय घालवली तर काही साधं एकमेकांशी संवाद साधण्याचं कौशल्य गमावून बसले. मानसशास्त्रज्ञांना हे आव्हान आहे, आगामी काळात.
25
134
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
गेल्या ५ वर्षात मलजल साफ करताना देशात ३३० सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला ही बातमी जितकी ���स्वस्थ करते त्यापेक्षा हे कामगार एका विशिष्ट जातीतले असतात हे वास्तव आतून उध्वस्त करतं.. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना आपल्याला ह्याची जाण असावी.
24
173
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 months
रिलायन्स ही एक गुजराती कंपनी होती, आहे आणि ह्यापुढेही राहील असं आज मुकेश अंबानी गुजरातमध्ये म्हणाले… चुकलंच मग, वाटत होतं की रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे आणि भारतीय कंपनीच रहाणार आहे. एका जागतिक पातळीवरच्या कंपनीच्या प्रमुखानं आपली आणि आपल्या कंपनीची ओळख एका राज्यापुरती…
64
279
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 months
आज दिल्लीत कन्नड माणूस रस्त्यावर येतो आहे. त्या मोर्चाचं नेतृत्व कर्नाटकाचे मुख्यमंत्री स्वत: करत आहेत. विषय महत्वाचा आहे. आपल्याही म्हणजे महाराष्ट्राच्याही दृष्टीनं महत्वाचा आहे. मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना कदाचित ह्याबाबत वृत्त देणार नाहीत म्हणून मुद्दाम लक्ष वेधावंसं…
63
296
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
जेंव्हा कुणी देशाचं नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेतो, तेंव्हा तो किंवा ती काय सोबत घेऊन जातात?.. त्यांच्यावरची शिक्षणातली, त्यांना वाढवण्यातली गुंतवणूक, त्यांचं कौशल्य, ज्ञान, अनुभव. असे ४ लाखांच्या आसपास गेल्या तीन वर्षात भारत सोडून गेले आहेत ह्याची जाणीव ठेवली पाहिजे आपण.
43
111
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
एका उच्चभ्रू वसाहतीत गेलो होतो. जगभरच्या गप्पा झाल्या. बहुतेकांची मुलं अमेरिकेत असल्यानं गप्पांना वैश्विक दर्जा होता.. त्या वसाहतीत फार कमी दाबानं पाणी येतं, पण कुणाला जाब विचारावा त्यांना माहीत नव्हतं.. तरीही राजकारणापासून लांब असलेलंच बरं असं ती मंडळी मला सारखं सांगत होती🙂.
54
87
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
5 years
अभिनंदन, राजू (प्रमोद) पाटील @rajupatilmanase .. जय महाराष्ट्र ! @mnsadhikrut
23
97
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
मोठमोठ्या लांबलचक टाळेबंद्यांमध्ये पुस्तकांनी चांगली साथ दिली .. #मैत्रीपुस्तकांशी
Tweet media one
12
26
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
महाराष्ट्रानंही “आत्मनिर्भर” व्हावं ..
35
100
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
5 years
“प्रचंड वाहतूककोंडी सर्वत्र पुण्यात” .. भाजपाकडे ३ खासदार, आठच्या आठ आमदार, १०० नगरसेवक असून काय अवस्था करून ठेवली आहे ह्या पुण्याची !
43
182
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
"आरे" ची ६०० एकर जमीन जंगल म्हणून राखून ठेवल्याचं वाचलं. हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा विषय पहिल्यापासून लावून धरला होता आणि आंदोलनं केली होती ह्याचं ह्यावेळी स्मरण झाल्याशिवाय रहावत नाही.. @CMOMaharashtra #मुंबई
11
89
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
न्यायालयातला आजचा निकाल सांगतो की “राज्यपाल चुकले”... मग आता राज्यपालांनी राजीनामा द्यायला पाहिजे का?
41
86
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
5 years
यदाकदाचित भाजपाला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालंच तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची ही शेवटची निवडणूक ठरावी असा त्यांचा प्रयत्न असेल..
80
186
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळ शेतकरी आंदोलन चालू आहे. हे आंदोलन व्हॅाटसअप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरचं नाही. रस्त्यावरचं आहे. त्यांच्याविरूध्द केसेस, लाठीमार, थंड पाण्याचे फवारे, विषारी प्रचार अशा सगळ्या गोष्टी करून झाल्या तरीही ते चालू आहे. ही साधीसुधी गोष्ट नव्हे.
33
121
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
अनुभव असा आहे की चार नगरसेवकांचा प्रभाग झाला तर नागरिकांना त्या चारांची नावंही सांगता येत नाहीत. आपल्या भागातील नागरी असुविधांबद्दल त्या चारांपैकी कुणाला जबाबदार धरायचं हे ही नागरिकांना समजत नाही.. तरीही आपल्याला चार नगरसेवकांचा एक प्रभाग असण्याची गरज का वाटते? @CMOMaharashtra
47
118
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
बिहारमधील सत्ताबदलानंतर हिंदी भाषा बोलली जाते अशा भागातील राजकारण वळण बदलू शकतं, कदाचित. ह्यामुळे २०२४ चा मोठा डाव लागायला सुरूवात झाली आणि तिथल्या "कमंडल-मंडल" राजकारणाचा पुढचा अध्यायही सुरू झाला असं म्हणता येईल.
26
64
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
सुनिता केजरीवाल, अरविंद केजरीवालांच्या पत्नी, एक महत्वाचं वाक्य म्हणाल्या.. "जब हम फिल्डमें रहते थे तो बिलकुल लगता था की जितेंगे, लेकिन जब सोशल मिडिया और अखबार पढते थे तो कुछ अलग लगता था.." .. ह्याचा अर्थ फार स्पष्ट आहे. नाही?
20
100
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
ब्राझीलमध्ये बोल्सनारो पराभूत झाले ही उत्ताम गोष्ट झाली.. आपला काय संबंध असं वाटेल असं म्हटल्यावर परंतु आपल्या पृथ्वीचं फुप्फुस असणारं अमेझॉनचं जंगल संपवायला निघालेल्या राज्यकर्त्याला चांगली शिक्षा झाली असं वाटलं..
20
87
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
स्वागत आहे !
Tweet media one
11
126
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
आज पुन्हा विनाअनुदानित गॅसच्या किंमती २५ रूपयांनी वाढल्या. ह्या फक्त ८ महिन्यात १८० ते १९० रूपयांनी गॅस महाग झाला आहे.. पण असो, कारण “का” हा प्रश्न आपण समाज म्हणून विचारायचाच नाही असं ठरवल्याचं दिसतं आहे.
36
135
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
प्रत्येक झाडाची एक गोष्ट असते..
Tweet media one
11
42
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
चर्चिलचं एक सुप्रसिध्द वाक्य आहे : “Success is not final, failure is not fatal. It is the courage to continue that counts.” .. म्हटलं आहे : यश कायम टिकणारं नसतं. अपयश हे संपूर्ण विनाश करणारं नसतं.. लढा चालू ��ेवण्याचं धैर्य हे सर्वात महत्वाचं असतं..
15
138
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
जी विकायला काढली आहे पण कुणी घेत नाही अशा एअर इंडियानीच आपल्या देशातल्या विदेशी अडकून पडलेल्यांना माघारी स्वदेशी आणले.. त्यावेळी इंडिगो असो किंवा विस्तारा असो, का बरं अडकलेल्या प्रवाशांना सोडवायला गेले नाहीत? सलाम एअर इंडियाला ! देशाच्या नागरिकांच्या मालकीच्या एअर इंडियाला !
20
123
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
मराठीत शपथ घेतलीत. आनंद वाटला.. जय महाराष्ट्र !
@priyankac19
Priyanka Chaturvedi🇮🇳
4 years
मी प्रियंका विक्रम चतुर्वेदी राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेते की .... Thank you Hon. Party Chief and Hon Chief Minister Shri @OfficeofUT ji, Hon Minister Shri @AUThackeray ji and @ShivSena 🙏🏼
4K
2K
27K
7
47
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
“शाळा जर अवाजवी फी आकारत असेल तर त्या विरूध्द दाद कुठे मागायची याबद्दलचा तपशील २२ जूनपर्यंत द्या” असा महत्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयानी दिला आहे.. ही माहितीच नसल्यानं अनेक पालकांची कुचंबणा होत होती.. आता हे बरं झालं.
24
129
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही म्हणून २४ वर्षाच्या स्वप्निलनं आत्महत्या केली ही घटना व्यवस्थेतील गंभीर दोष दर्शवते... खूप वाईट वाटलं.. ही एक सूचना आहे. मुला-मुलींसमोरची स्वप्नं पूर्ण होतील अशी सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती आणि संधी मिळेल अशी व्यवस्था, गरजेची आहे.
31
224
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
महाराष्ट्राचे जे भाग "लाॅकडाऊन" उठल्यावर आधी सुरू होणार तिथे नव्यानं परप्रांतीय कामासाठी येतील. त्यांना काम मिळण्याआधी १) तिथे स्थानिक लोकांना प्राधान्यानं कामावर घेणे किंवा, २) मराठी मुला-मुलींनाच काम मिळेल असं पहाणे ही कामं राज्य-सरकार प्राधान्यानं करणार आहे का? @CMOMaharashtra
33
178
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
प्रगत दृष्टी असलेला समाज, शिक्षित आणि कुशल मनुष्यबळ, प्रबोधनाची मोठी परंपरा आणि व्यापार तसेच उद्योगस्नेही राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण असल्याशिवाय भांडवल येऊन संपत्तीची सतत निर्मिती होत रहात नाही. महाराष्ट्राच्या मा. राज्यपालांनी महाराष्ट्राचा हा इतिहास जाणला पाहिजे.
35
134
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
युक्रेनमधे २००० भारतीय विद्यार्थी शिकत आहेत हे जरा धक्कादायक वाटलं. नंतर माहिती मिळाली की एकूण ८ लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी परदेशात शिकायला जातात आणि ते तिकडे २,१०,५८१ कोटी रूपये खर्च करतात, त्यातले ४५,००० कोटी रूपये फक्त शुल्कावर खर्च करतात.. असं का? आपलं काय चुकतंय?
87
137
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
फक्त मुंबईहून नव्हे तर कुठूनही पुण्यात शिरताना प्रचंड वाहतुककोंडी होते. शहरातल्या रस्त्यांवर तर असतेच.. एखादा पूल पाडण्यानं थोडाफार फरक पडेल परंतु जोपर्यंत नागरिक सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना आणि आमदारांना गंभीरपणे खरे प्रश्न विचारणं सुरू करत नाहीत तोपर्यंत हे असंच चालणार..
21
109
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळासोबत राज्यपालांना भेटायला उद्या जाणार आहे.. काही सुचवायचं असल्यास जरूर कळवा .. धन्यवाद. जय महाराष्ट्र !
180
70
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
दिवाळीच्या आदल्या आठवड्यात इतका जोरदार सलग अनेक दिवस पाऊस हे विचित्र आहे.. निसर्गचक्र बिघडलंय, समतोल ढळलाय.. आणि, आपण म्हणणार इतक्या मोठ्या प्रश्नावर मी एक माणूस काय करणार? .. पण तसं म्हणू नये कारण .. प्रश्न कितीही मोठा असला तरी माणसाचा “विवेक” आणि सामुहिक शहाणपण मार्ग काढेलच.
22
95
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
इगतपुरीला कसारा घाटात ८ किलोमीटर्स लांबीचे जुळे बोगदे विक्रमी अशा वेळेत पूर्ण केले गेले. असं म्हणतात हा देशातील सर्वात रूंद (१७.५ मीटर्स) बोगदा आहे. ह्यानं कसारा घाट ओलांडायला ३५ मिनिटांचा वेळ लागतो ते फक्त ५ मिनिटात पूर्ण केले जाईल.. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचं अभिनंदन..
11
66
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
प्रबोधनकारांचं समग्र लेखन इथे वाचा :
14
142
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
तयारी जोरात … #पाडवामेळावा
Tweet media one
25
86
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
कडक उन्हाळ्यात शहरात रहाणं अवघड होत चाललं आहे.. अशा वेळी शहरांच्या नियोजनातच मोठे बदल केले पाहिजेत.. जसं की घरांच्या छप्परांना पांढरा रंग देणं, मधेमधे दाट झाडांची बेटं बनवणं इत्यादी.. पहिला पाऊस पडला की आपण हे विसरून जाऊ पण आपण नागरिकांनी निवडणुकांमध्ये ह्याचा आग्रह धरला पाहिजे.
35
118
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
शाळा लवकरात लवकर सुरू करून मुलं शाळेत शिकतील हे अवघ्या महाराष्ट्राचं ध्येय असलं पाहिजे..
24
77
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
ज्यावर गेले काही दिवस वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरले, वृत्तवाहिन्यांनी हाच महाराष्ट्राचा महत्वाचा विषय असल्यासारखं वृत्तांकन केलं तो राज्यसभा निवडणुकीचा विषय संपला. आता विनंती ही की त्यांनी त्या वेळेच्या १०% वेळ खर्च करून हे सदस्य राज्यसभेत काय काम करतात हे आम्हाला सांगावं.
19
119
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
काल रविशकुमार ह्यांनी त्यांच्या कार्यक्रमात पत्रकारितेची ५ तत्वं - पंचतत्वं - सांगितली.. १) कधी? २) कुणी? ३) कुठे? ४) कसं? आणि ५) का? ... ही फक्त पत्रकारितेची पंचतत्वं नाहीत तर "जागरूक नागरिकत्वाचीही" आहेत.. नागरिक म्हणून, मतदार म्हणून, आपल्यालाही हे प्रश्न पडत रहायला हवेत.
14
106
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
कालचा रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल पाहिल्यावर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागेल ह्याचा अंदाज येतो. सर्वात अधिक फटका गरीबातल्या गरीबाला बसला असंही बॅंक मान्य करत आहे. दुर्दैवानं राजकारण ह्याभोवती न फिरता भलतीकडेच फिरतंय.. #आर्थिकस्थिती
15
146
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
महाराष्ट्रात विविध शासकीय विभागात मिळून सुमारे अडीच लाख मंजूर पदे रिक्त आहेत ह्या वृत्तावर विश्वासच बसला नाही, परंतु तसे वृत्त वाचण्यात आले. ह्याकडे तातडीनं लक्ष द्यायला पाहिजे @CMOMaharashtra .. एकतर बेरोजगारांना रोजगार मिळेलच, शिवाय प्रशासनावरचा ताणही कमी होईल..
27
186
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ऐकताना पाय जमिनीवर आहेत असं वाटतं.. परिस्थितीबरोबर आपली नाळ जुळल्याचं जाणवतं. काहीतरी आपल्या आवाक्यातलं, आपल्या जगण्यातलं असल्यागत वाटतं.. निवडून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन !
13
75
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
2 years
भाषा हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.. तामिळनाडूत तर अधिकच..
Tweet media one
25
132
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरात अहमदाबादला.. देशातलं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र - गिफ्ट - अहमदाबादला. देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबादला.. हे सारं नेपथ्य गेल्या ५ वर्षातलं .. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास”
107
116
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
5 years
कोथरूडकरांनी निवडून दिल्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून चंद्रकांत पाटील १ लाख साड्या वाटणार आहेत आणि स्थानिक नगरसेवकांना हे पसंत नाही.. दोन गोष्टी.. एक म्हणजे कोथरूड काय ते चंद्रकांत पाटीलांना कळलेलं नाही आणि दोन, आमदाराचं काम काय हेही त्यांना माहीत नाही..
78
120
986
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
पेट्रोल, डिझेलचे सतत चढे दर ही चिंतेची गोष्ट आहे. वास्तविक मार्च ते डिसेंबर ह्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ३% नी भाव उतरले. मात्र देशात पेट्रोल १७% तर डिझेल १५% नी वाढलं. ह्यात सरकारी करांचा वाटा पेट्रोलला ६३% तर डिझेलला ५८.६% आहे. इतका बोजा नागरिकांवर का?
29
118
993
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
“ड्रेसकोड” ला छान शब्द वाचला. “वस्त्रसंहिता”.. सुंदर. अजून सोपा शब्द कुणाला सुचतोय का? #पर्यायीमराठीशब्द
61
37
996
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
1 year
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरच्या टोलमध्ये सुमारे १८% नी वाढ झाली आहे. हे समजल्यावर काही प्रश्न मनात येतात. १) हा रस्ता करण्यासाठी जो खर्च आला तो ह्या अगोदरच वसूल झाला आहे ना? असेल तरी मग टोल का आकारला जातो आहे? नसेल तर आणखी किती रक्कम वसूल होणे बाकी आहे? २) मुंबई-पुणे एक्सप्रेस…
1
244
1K
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
3 years
इयत्ता पहिली आणि दुसरी मी ह्या शाळेत शिकलो. नवीन मराठी शाळा, पुणे. शाळा तशी आत्ता आत्ताच सुरू झाली १८९९ साली 😊.. ह्या शाळेनं मला जे दिलं ते अमूल्य आहे.. #माझीशाळा
Tweet media one
4
22
998
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
1 year
आता ह्या पुढे लोकसंख्येवर आधारित लोकसभेचे मतदारसंघ तयार केले तर दक्षिण भारतावर मोठा अन्याय होईल. २०२६ साली मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे आणि मतदारसंघ वाढणार आहेत. अशावेळी फक्त लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ बनवणं चूक ठरेल. कारण, एका अर्थानं लोकसंख्या कमी करण्याचं धोरण यशस्वी…
39
169
996
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
4 years
केशकर्तनालयं बंद असल्यानं घरीच केस कापले. लक्षात आलं की ते किती कौशल्याचं काम आहे आणि आपण किती कमी पैसे मोजतो.. अशा खूप गोष्टी आहेत ज्याचं "मूल्य" जास्त आहे पण "किंमत" कमी.. उदाहरणार्थ: वृत्तपत्रातलं लेखन. खूप ज्ञान मिळतं पण त्यामानानं लेखकाला पैसे कमी.. हे बदललं पाहिजे.
25
54
971
@anilshidore
Anil Shidore अनिल शिदोरे
1 year
देशातील ८१ कोटी ३५ लाख लोकांना सरकार फुकट अन्न देणार आहे. काल दिल्लीत निर्णय झाला.. मला संभ्रम पडला आहे की गरीबांना ह्यामुळे अन्नसुरक्षा मिळतीय म्हणून आनंद वाटून घेऊ की देशातल्या ८१.३५ कोटी लोकांना फुकट अन्न द्यावं लागतंय अशी देशाची आर्थिक परिस्थिती आहे म्हणून वाईट वाटून घेऊ?
49
133
992