ShriPatilKarad Profile Banner
Shriniwas Patil Profile
Shriniwas Patil

@ShriPatilKarad

Followers
43K
Following
693
Media
5K
Statuses
8K

Former Member of Parliament - Lok Sabha - Satara | Former Governor - Sikkim State | Former bureaucrat | Member - @NCPspeaks | RT Not Endorsements

Karad, Satara
Joined October 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
3 days
कार्यक्रमात नागरी सेवेत कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. 'वास्तू ऋण' या संकल्पनेवर आधारित कलामंडळाच्या विद्यार्थ्यांचा संस्कृतिक कार्यक्रम हा देखील विशेष अनुभव होता.
0
0
0
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
3 days
मूल्ये आणि प्रशासनातील सेवाभाव यांचा संगम घडवून आणलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी होता. पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा हा सुंदर उपक्रम पुढेही अधिक व्यापक व्हावा अशी अपेक्षा.
1
0
0
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
3 days
योग्य सवयी, चांगली संगत आणि स्पष्ट ध्येय हीच उंची गाठण्याची खरी गुरुकिल्ली आहे. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित मुख्य इमारत व माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळाव्यात सहभागी होण्याचा सन्मान लाभला. शिक्षण प्रसारक मंडळीने परंपरा,
1
0
0
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
3 days
त्या काळात लाभलेल्या उत्तम गुरुजन आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात दिशा ठरवणे सहज झाले. महाविद्यालयीन जीवन हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते ते व्यक्तिमत्व, संस्कार आणि दृष्टीकोन घडवणारे महत्त्वाचे वळण असते.
1
0
0
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
3 days
आज पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालय (एस.पी कॉलेज) येथे महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या शताब्दी निमित्ताने आयोजित केलेला माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा संपन्न झाला. सन १९५७ ते १९६१ या कालावधी�� मी स.प. महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो.
1
0
6
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
7 days
आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन यानिमित्ताने वेणूताई चव्हाण ट्रस्ट, कराड येथे त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
0
0
9
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
7 days
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी. त्यांचे कर्तृत्व व कार्यक्षम कारभार महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला. सर्वसामान्याविषयी अखंड आत्मियता बाळगणाऱ्या त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला यानिमित्ताने विनम्र अभिवादन!
0
0
4
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
8 days
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या विविधांगी भूमिका आणि चतुरस्त्र अभिनय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान कलावंत गमावला.भावपूर्ण श्रद्धांजली.
0
0
6
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
11 days
प्रकाशाच्या मर्यादेबद्दलचा 'रामन इफेक्ट'चे संशोधन केलेेले नोबेल पुरस्कारप्राप्त भारतीय शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ.चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन.
0
0
3
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
13 days
देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
0
1
4
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
13 days
भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला होता. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
0
0
1
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
13 days
ब्रिटीशांविरोधात प्रखर लढा देताना धोरणीपणा, चातुर्य, युद्धशास्त्र निपूणता आणि नेतृत्व गुण सिद्ध करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई ऊर्फ मणिकर्णिका तांबे यांची आज जयंती. मूळच्या सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे मोरोपंत तांबे आणि
1
0
4
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
15 days
राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
0
0
3
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
15 days
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. जनमानसावर छाप सोडलेल्या त्यांच्या व्यक्तीमत्त्वाने मराठी मनात अढळ स्थान निर्माण केले. यानिमित्ताने यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
0
0
4
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
16 days
नाडे, नवारस्ता (ता.पाटण) येथे हॉटेल प्रणयाच्या उद्धाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहून श्री.प्रविण सूर्यवंशी व सूर्यवंशी परिवारास शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
0
0
5
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
17 days
भूदान चळवळीचे प्रणेते, बंधुत्व आणि अहिंसेचे आग्रही गांधीवादी न���ते, स्वातंत्र्यसैनिक, थोर समाजसुधारक, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
0
0
4
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
17 days
ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढा उभारून आदिवासींच्या हक्क आणि अधिकारासाठी क्रांतीचा एल्गार पुकारणारे महान क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
0
0
3
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
21 days
स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते, भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया रचणारे देशाचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
0
0
3
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
24 days
ज्येष्ठ साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तीमत्व आदरणीय भाईंना यानिमित्ताने विनम्र अभिवादन.
0
0
1
@ShriPatilKarad
Shriniwas Patil
24 days
पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु.ल.देशपांडे यांची आज जयंती. समोरचा माणूस वाचून त्यातले सगळे गुण, दोष, लकबी, केशभूषा, वेशभूषा हेरून त्याचे स्वभावविश्लेषण करून शब्दांद्वारे अजरामर व्यक्तीचित्रणे वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत उभे करणारे शब्दप्रभू,
1
0
2