namdevwrites Profile Banner
Namdev Katkar Profile
Namdev Katkar

@namdevwrites

Followers
7K
Following
2K
Media
674
Statuses
5K

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022).

Joined October 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@namdevwrites
Namdev Katkar
6 hours
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमधील 'कामामुळे निर्माण होणारा ताण' या विषयावरील लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. विशेषत: डेस्क किंवा अगदी फिल्डवर काम करणाऱ्यांनीही वाचायला हवा. या लेखाच्या उजव्या कोपऱ्यात दिलेली 'वर्क चेकलिस्ट'ची चौकट खूप महत्त्वाची आहे.
Tweet media one
0
0
8
@namdevwrites
Namdev Katkar
12 hours
'मुक्त शब्द'च्या चालू अंकात अंकुश आवारेंचा 'नवउदारमतवाद : यशस्वी वैचारिक क्रांती' लेख आलाय. वाचनीय आहे. यापूर्वी आवारेंचाच ऑक्टोबर २०२० च्या 'मुक्त शब्द'च्याच अंकात 'लोकशाहीचा अवकाश गिळंकृत करणारा नवउदारमतवादी शासन सत्ताविवेक' हा लेख आला होता. तोही महत्त्वाचा होता. #Neoliberalism.
0
2
10
@namdevwrites
Namdev Katkar
12 hours
'लाडकी बहीण योजने'चं श्रेय सगळे पुरुष मंत्री 'लाडका भाऊ-लाडका भाऊ' करून घेतात आणि योजनेतल्या कमतरतेची स्पष्टीकरणं ही योजना महिला व बालविकास खात्याअंतर्गत येते म्हणून आदिती तटकरेंना द्याव्या लागतात. ते प्रक्रियेनुसार बरोबर असेलही, पण श्रेय घेत फिरणाऱ्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे.
@iAditiTatkare
Aditi S Tatkare
1 day
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची.
0
0
6
@namdevwrites
Namdev Katkar
3 days
अतुल पेठे सरांनी लोकसत्तेच्या लोकरंगमध्ये (२० जुलै) लिहिलेला 'आजारी समाजाच्या नोंदी' हा लेख वेळ काढून वाचा. इथे जोडलेल्या स्क्रीनशॉटमध्ये नीट दिसत नसेल, तर लोकसत्तेच्या साईटवर शोधून वाचा, पण वाचा. आता काय सुरू आहे आणि काय आव्हानं उभी राहत आहेत, हे नेमकं लिहिलंय.
Tweet media one
Tweet media two
0
4
28
@namdevwrites
Namdev Katkar
7 days
हे माझं हिरवंकंच स्वप्न! या स्वप्नाचे काही कण आठवणींच्या कप्प्यात साठवायचे आणि पुन्हा शहराची वाट धरायची. मग शहराच्या सापळ्यातून थोडी सुटका करून पुन्हा या स्वप्नापाशी यायचं, पुन्हा परतण्यासाठी. हे एक अविरत चक्र. नकोसं, पण अपरिहार्य!
Tweet media one
1
0
19
@namdevwrites
Namdev Katkar
7 days
उत्तम फिक्शन लिहिणारे इतर भाषांमधील फिक्शन आपल्या भाषेत उत्तमपणे आणतात, असा एक अनुभव आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी केलेल्या 'मंतरलेले बेट' आणि 'सुमीता'मुळे असं माझं मत बनलं असेल कदाचित. जीएंनी भाषांतर केलेल्या या कादंबरीत्रयींचा अनुभव अजून घ्यायचा आहे. संग्रहात दाखल झाल्यात.
Tweet media one
1
0
18
@namdevwrites
Namdev Katkar
9 days
'आवर्तन' पूर्वीच वाचली होती. आता 'स्थलांतर' वाचली. दोन्ही कादंबऱ्या आवडल्या. दरम्यान 'प्रवास' वाचलं. पण ते नॉन-फिक्शन. सानिया मानवी नातेसंबंधांमधली गुंतागुंत कुठेही जज न करता कथानकांमधून समोर ठेवतात. बोकील, सासणेंच्या कथानकांबाबतचाही असाच अनुभव आहे. सुंदर आहे ही कादंबरी.
Tweet media one
0
0
9
@namdevwrites
Namdev Katkar
10 days
आज मित्रांसोबत कनॉट प्लेसच्या (दिल्ली) प्रसिद्ध 'निजाम्स काठी कबाब'मध्ये गेलो होतो. या रेस्टॉरंटमध्ये एक पाटी दिसली, जिच्यावर लिहिलं आहे ― 'प्रादेशिक, धार्मिक, जातीय, रंगभेद, पक्षपात एवं बाहर से लाया हुआ खानपान रेस्तरां में वर्जित है'.
Tweet media one
Tweet media two
0
4
99
@namdevwrites
Namdev Katkar
10 days
पन्नास वर्षांपूर्वी ही कादंबरी अश्लीलतेचा शिक्का पुसण्यासाठी सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून आली होती. ही कादंबरी वाचण्याची उत्सुकता होती. काल एका दिवसात पूर्ण केली. कादंबरीचे कथानक ठिकठाकच आहे, पण पंकज भोसलेंनी लिहिलेली प्रस्तावना अफलातून आहे. तीच वाचायला खरी मजा येते.
Tweet media one
0
0
16
@namdevwrites
Namdev Katkar
10 days
अवधूत डोंगरे हे तरुण लेखकांमधील सर्वात शार्प आणि सेन्सिबल लेखक आहेत. ते सातत्यपूर्ण आणि गांभीर्यानं लेखन करतात. त्यांच्या 'एक रेघ'वरील लेखांचं 'रेघ' नावानं नुकतेच येशू पाटलांच्या शब्द प्रकाशननं पुस्तकही आणलंय. ते संग्रही ठेवण्यासारखं आहे. अवधूत उत्तम भाषांतरकारही आहेत.
@Golden_Eagle098
Golden_Eagle
10 days
@namdevwrites धन्यवाद नामदेव सर, . मनीष कुंजाम यांची पूर्ण मुलाखत वाचली. तुमच्या माध्यमातून माहिती-समृद्ध होतो आहे. अवधूत डोंगरे सरांचा ब्लॉगही जतन केला आहे. नक्षलवाद या विषयाचे अनेक कंगोरे समजून घ्यायला मदत होईल. पुनश्च धन्यवाद 🙏.
1
0
12
@namdevwrites
Namdev Katkar
10 days
मनिष कुंजाम यांच्या या मुलाखतीसाठी अवधूत डोंगरे यांचे मनापासून आभार. वेळ काढून, आवर्जून ही मुलाखत वाचा.
1
1
3
@namdevwrites
Namdev Katkar
11 days
खरंतर साहित्य-संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर हे पुस्तक पीडीएफमध्ये उपलब्ध आहे. तिथंच वाचलं होतं. पण हार्ड कॉपी हवी होती. बरेच दिवस शोधत होतो. अखेर संवाद ग्रंथ वितरणच्या शशी पवारांनी पाठवली. अशी पुस्तकं संग्रही असावीतच. डॉ. आ. ह. साळुंखे तात्यांनी भाषांतर केलंय.
Tweet media one
1
0
5
@namdevwrites
Namdev Katkar
12 days
राजकारण इतकं सोपं अन् सुटसुटीत आहे. आपण उगाच डोक्याचा भुगा करत बसतो. भाजपमध्ये येतोय, मग खुनाचा का गुन्हा असेना, तो मागे घेऊन 'स्वच्छ चारित्र्या'त रुपांतरीत करता येऊ शकतं की एखाद्याला! महाराष्ट्राला अशा राजकारणाची गरज आहे. गुड वन! कीप इट अप!
Tweet media one
2
53
227
@namdevwrites
Namdev Katkar
13 days
मोठ्या आवडीने आणि मेहनतीने आई शेती करते. नांगरणी केवळ मजुरीने करावी लागते. अन्यथा सर्व कामे एकटीने पार पाडते. खरंतर शेतीतून काहीच फायदा नाही. आपल्याच खिशातले पैसे खर्ची होतात. दरवर्षी सांगतो, नको आता हे विकतचे दुखणे. पण आई म्हणते, भात आपला देव हाय, खलाटी वसाड टाकून जमणार नाय! 🌿
28
60
727
@namdevwrites
Namdev Katkar
13 days
गेले १५ दिवस गावी होतो. दरम्यान १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा आणि आमच्या रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस अशा निमित्ताने माझ्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. #Roha #Raigad
Tweet media one
Tweet media two
1
0
16
@namdevwrites
Namdev Katkar
27 days
बोकील सरांचं हे पुस्तक वाचलं नसतं, तर मंगोलिया हा देश इतका सखोल आणि इतक्या अंगांनी कळलाच नसता. समाज-संस्कृतीच्या अंगानं बोकील सर एखादा देश डोळ्यांसमोर उभा करतात. त्यांच्या यापूर्वीच्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' आणि 'समुद्रापारचे समाज' या दोन्ही पुस्तकांबाबतही असाच अनुभव आहे.
Tweet media one
1
2
46
@namdevwrites
Namdev Katkar
28 days
अमर हिंद मंडळाच्या १९४९ सालच्या व्याख्यानमालेत, म्हणजे राज्यघटना निर्मितीचे कार्य सुरू असताना, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी ‘धर्म आणि राष्ट्र’ यासंबंधी मांडलेले विचार आजच्या घडीला तर अधिक विचार करण्यासारखे आहेत. (संदर्भ : तर्कतीर्थ विचार, लोकसत्ता, ३० जून)
Tweet media one
1
1
10
@namdevwrites
Namdev Katkar
28 days
प्रा. दीपक पवार सर #मराठी भाषेचा हा लढा केवळ दोन महिने नाही, दोन दशकं लढत आहेत. दीपक सर आणि मराठी अभ्यास केंद्राच्या सातत्यपूर्ण लढतीचे हे यश आहे. राजकारण्यांच्या आशेवर ते कधीच राहिले नाहीत, हे विशेष. सरांचे आभार, @drdeepakpawar.
4
52
368
@namdevwrites
Namdev Katkar
28 days
उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषेदत राज ठाकरेंबाबत अत्यंत सकारात्मक दिसले. 'त्रिभाषेचा निर्णय रद्द' झाल्यानंतरही (परिणामी एकत्रित मोर्चाचा उद्देश पूर्ण झाल्यावरही) मनसेसोबत एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नांना ते उत्तरं देतायेत. याचा अर्थ, मनसेसोबत युतीचा ते गांभिर्यानं विचार करतायेत.
0
2
21
@namdevwrites
Namdev Katkar
28 days
राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरेंना माध्यमांनी विचारल्यावर ते म्हणाले, "एखादं संकट आल्यावर एकत्र येण्यापेक्षा एकत्र आलो तर संकट येणार नाही, अशी माझी धारणा आहे.".
2
16
177