महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून #एसटी कर्मचारी आंदोलनास येत असताना महाआघाडी सरकारने जागोजागी पोलिस बंदोबस्त लावून त्यांना अडवण्याचे काम केले. परंतु छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे गणिमीकावा करत सरकारच्या छाताडावर पाय देऊन या मावळ्यांनी अखेर आझाद मैदान गाठले.
मंत्रालयाकडे कूच करताना मला व किरीटजींना अटक करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आघाडी सरकारने केला.आझाद मैदानावर सर्व एसटी कामगार बंधू भगिनींशी संवाद साधला.सोबत भाजपा नेते किरीट सोमय्या जी, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर जी, माजी मंत्री आ.गिरीश महाजन जी,