ceozpthane Profile Banner
ZPTHANE Profile
ZPTHANE

@ceozpthane

Followers
2K
Following
204
Media
2K
Statuses
3K

Official Account of Zilla Parishad, Thane

Thane, India
Joined March 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@ceozpthane
ZPTHANE
11 days
ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी.
Tweet media one
0
1
3
@ceozpthane
ZPTHANE
4 hours
डॉ. अविनाश पोळ यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’चे उद्दिष्ट, सहभागाची पद्धत, लाभ आणि पारितोषिकांची माहिती सविस्तर दिली. त्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, उत्पादनवाढ, नफावाढ आणि जैविक शेतीच्या दिशेने होणारे सकारात्मक बदल यावर भर दिला.
0
0
0
@grok
Grok
11 hours
Generate videos in just a few seconds. Try Grok Imagine, free for a limited time.
76
30
382
@ceozpthane
ZPTHANE
4 hours
पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद, ठाणे येथे करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
1
@ceozpthane
ZPTHANE
4 hours
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात “हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग आणि राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
5 days
एकूण नफा ₹ ६३,१८०/- इतका झाला. हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे.
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
5 days
विविध डोंगरी,दुर्गम व जंगली भागांतून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून एकूण ५० स्टॉल्सची मांडणी करण्यात आली होती,ज्यामध्ये १०० स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Tweet media one
Tweet media two
1
0
0
@ceozpthane
ZPTHANE
5 days
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘रानभाज्या महोत्सव २०२५–२६’ चे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव आज, द. ६ ऑगस्ट, २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका, ठाणे येथे पार पडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
1
@ceozpthane
ZPTHANE
5 days
यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गटविकास अधिकारी अंबरनाथ पंडीत राठोड, उप अभियंता पंकज कोचुरे आदी अधिकारी उपस्थित होते.
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
5 days
जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली वांगणी व बेलवली (बदलापूर) येथे दिनांक. ५ ऑगस्ट २०२५ रोजी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक उपक्रम राबविण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
2
@ceozpthane
ZPTHANE
6 days
पावसाळ्यातील आरोग्यदायी भेट – रानभाज्या महोत्सवात आपले स्वागत आहे!. ठिकाण: बी. जे. हायस्कूल आवार, टेंभी नाका, ठाणे.दिनांक:६ ऑगस्ट २०२५.वेळ: सकाळी १० ते सायं. ६
Tweet media one
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
7 days
🌟 सकारात्मक बदलांची सुरुवात माहितीपासून होते! 🌟.जिल्हा परिषद ठाणे – तुमच्यासोबत, तुमच्यासाठी!!. #सकारात्मकठाणे #SmartCitizen #ThaneZPUpdates
Tweet media one
0
0
2
@ceozpthane
ZPTHANE
7 days
"अवयव दान म्हणजे जीवनदान!" .एका निर्णयाने तुम्ही अनेक जीव वाचवू शकता. दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असतात. आपल्या एका कृतीने त्यांना मिळू शकते नवजीवनाची संधी!. #OrganDonation #DonateLife #ZPThane #SocialAwareness
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
10 days
जिल्हा परिषद ठाणे – तुमच्यासोबत, तुमच्यासाठी!!. फक्त Follow करा आणि बना सजग, जागरूक आणि सहभागी नागरिक. QR कोड स्कॅन करा आणि थेट जोडा जिल्हा परिषद ठाणेसोबत!.तुमचा सहभाग म्हणजे प्रगतीचा विश्वास!. "जाणीवसंपन्न समाजासाठी, सजग नागरिकत्व हीच गरज!" . #ZPThane #सजगठाणे #FollowZP
Tweet media one
0
1
3
@ceozpthane
ZPTHANE
10 days
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
Tweet media one
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
10 days
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! . शोषित, वंचित, कामगार, भूमिहीन आणि उपेक्षित घटकांच्या जीवनाला शब्दबद्ध करणारे क्रांतिकारी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे. #अण्णाभाऊसाठे #Jayanti #Lokshahir #DalitLiterature #ZPThane #जिल्हापरिषदठाणे
Tweet media one
0
1
3
@ceozpthane
ZPTHANE
11 days
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच अर्थ विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. #ZPThane #PensionSupport #EmployeeWelfare #SocialSecurity.
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
11 days
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सेवा करत असताना निधन झालेल्या कै. नागेश पाटील (वाहनचालक) यांच्या पत्नी श्रीम. दया नागेश पाटील यांना जुनी पेन्शन अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. लाभांचे हस्तांतर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
Tweet media one
1
1
5
@ceozpthane
ZPTHANE
11 days
अवयव दान सप्ताह निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी विविध उपक्रम दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यत आयोजन करण्यात आले आहे. अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शैक्षणिक सत्रे, चर्चासत्र, जनजागृती रॅली, पोस्टर प्रदर्शन व वैद्यकीय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
Tweet media one
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
12 days
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने "अखिल भारतीय शिक्षा समागम सप्ताह" साजरा केला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
12 days
जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे @Info_Thane1 यांच्या सेवापूर्ती निमित्त जि. प. ठाणे येथे गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी यांनी उपस्थित राहून आपल्या स्नेहपूर्ण भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
0
5