NandedPolice Profile Banner
नांदेड पोलीस - Nanded Police Profile
नांदेड पोलीस - Nanded Police

@NandedPolice

Followers
12K
Following
416
Media
1K
Statuses
2K

नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Nanded, India
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
2 days
बलात्कार व पोक्सो प्रकरणातील फरार 2 आरोपी जेरबंद! नांदेड पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांना मोठे यश! गंभीर गुन्हा करून तब्बल 3 वर्षांपासून फरार असलेल्या 2 आरोपींचा शोध पथकाने कसून शोध घेत अखेर यशस्वीपणे मागोवा घेत अटक केली.
0
0
3
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
2 days
सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक कारवाई! 🚔 29 नोव्हेंबर रोजी नांदेड पोलिसांच्या सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक मोहीम राबवली.
0
0
0
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
2 days
अवैध रेत उपसा ठिकाणी नांदेड पोलिसांची धडक कारवाई! नांदेड पोलिसांनी अवैध रेत उपसा करणाऱ्यांवर मोठी मोहीम राबवत एकूण ₹45 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोस्टे मुदखेड येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल #NandedPolice #OperationFlushOut #IllegalSandMining #PoliceAction
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
3 days
अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी थांबा! • प्रोफाइल फेक आहे का तपासा (फोटो, फ्रेंड्स, पोस्ट्स). • ओळख नसेल तर प्रथम मेसेज करा — साधे प्रश्न विचारा. • शंका असल्यास ब्लॉक व रिपोर्ट करा. हॅकिंग आणि ओळखदाखल फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक. #ThinkBeforeYouAccept
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
4 days
ऑपरेशन फ्लश आउट घरफोडी करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद! शिवाजीनगर, हदगांव आणि मुदखेड परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपींवर नांदेड पोलिसांची निर्णायक कारवाई. जप्त मुद्देमाल: सोन्याचे 5 तोळ्याचे दागिने – ₹70,410 नगदी – ₹15,000 एकूण: ₹85,410! #OperationFlushOut #NandedPolice
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
4 days
सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कठोर धडक कारवाई. विविध पोलीस स्टेशनच्या पथकांकडून एकूण 18 आरोपींवर कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य — सुरक्षित रस्ते, शांत शहर! #CityStreetSafety
1
1
4
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
5 days
सोशल मीडियावरील वापर सावधगिरीने करा — तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता तुमच्या हातात आहे! ✅ प्रायव्हसी सेटिंग तपासा (Profile, Posts, Photos) ✅ दुहेरी प्रमाणीकरण (2FA) सेट करा ✅ अनोळखी मित्र/फॉलोअर स्वीकारू नका सतर्क रहा, सुरक्षित रहा. #CyberSafety #StaySafeOnline #NandedPolice
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
5 days
अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, मेसेज किंवा व्हिडिओ कॉलद्वारे भीती दाखवून पैसे मागणे — हा सायबर ब्लॅकमेलिंगचा सापळा असू शकतो. 🔸 घाबरू नका — सावध व्हा! 🔸 तक्रार करा — 1930 किंवा https://t.co/Ze684hTkti वर वेळीच सावधानता म्हणजेच सुरक्षितता! #CyberAwareness #StayAlert
0
0
1
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
6 days
🇮🇳 इतिहास घडवणाऱ्या टीम इंडियाला सलाम! 🇮🇳 पहिल्या टी-20 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या शूर बेटींनी मिळवलेले हे ऐतिहासिक यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. नांदेड पोलीस दलातर्फे टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन!
0
0
1
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
7 days
नांदेड पोलिस दलाचे ‘मिशन समाधान’ तक्रार निवारण दिनांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 139 अर्जांची तत्काळ निकाली कार्यवाही! नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी केले आहे. #MissionSamadhan #NandedPolice
1
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
10 days
दुहेरी हत्येचा गुन्हा अवघ्या 12 तासांत उघडकीस, दोन्ही आरोपी जेरबंद. पोलीसांच्या 4 टीम, 3 जिल्ह्यांत शोध आणि गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना केले अटक. #NandedPolice #MaharashtraPolice #CrimeDetection #PoliceAction #JusticeServed #SafetyFirst
0
0
1
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
10 days
सायबर फ्रॉडमधून गमावलेले 4 लाख रुपये नांदेड सायबर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे 72 तासांत तक्रारदाराला परत ! फसवणूक करणाऱ्यांनी APK फाइलद्वारे क्रेडिट कार्डची माहिती मिळवून फसवणूक केली होती. ऑनलाईन फ्रॉडपासून सावध रहा — APK फाइल्स डाउनलोड करू नका #सायबरसुरक्षा #CyberCrime
0
1
3
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
11 days
नांदेड शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई! अवैध प्रवाशी वाहतूक, ना-परवाना वाहने व अतिक्रमणांवर एकूण 80 केसेस दाखल. वाढत्या ट्रॅफिक समस्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांचे विशेष उपक्रम सुरू. #NandedPolice #MaharashtraPolice #TrafficAction #RoadSafety #IllegalTransport #TrafficDiscipline
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
11 days
ऑपरेशन फ्लश आऊट नांदेड पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई! फायबर व इंजिन बोटींसह ₹75 लाखांचा मुद्देमाल जप्त. उस्माननगर व स्थानिक गुन्हे पथकाची संयुक्त धडक कारवाई. #NandedPolice #OperationFlushOut #AvaidhValu #IllegalSandMining
1
0
3
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
14 days
अवैध वाळू विक्री करणाऱ्या आरोपीला नांदेड पोलिसांनी केले जेरबंद. जप्त मुद्देमाल : • टिप्पर – 20 लाख • 5 ब्रास रेती – 20 हजार एकूण 20 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पो. स्टे. लिंबगाव येथे आरोपीवर गुन्हा दाखल. #AvaidhValu #StopIllegalSandMining #NandedPolice
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
14 days
मिशन समाधान अंतर्गत एकूण 130 तक्रारींचे निवारण करण्यात आले. नांदेड पोलीस दलाकडून तक्रार निवारणासाठी विशेष मोहिम दर शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित. #NandedPolice #MissionSamadhan #PublicService
0
0
0
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
14 days
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन विविध आरोपींवर कारवाई. 22 रेकॉर्डवरील आरोपी, 7 चोरी–घरफोडीतील आरोपी ताब्यात. नाकाबंदीमध्ये 110 वाहनांची तपासणी, हॉटेल-लॉज तपासणी, 5 बॅलेबल व 2 नॉन-बॅलेबल वॉरंट बजावले. 1 हद्दपार आरोपीवर कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल. #CombingOperation
0
0
1
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
14 days
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी गंभीर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या गुप्त माहिती व सायबर सेलच्या मदतीने झाडीमध्ये लपून बसलेल्या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हा शाखेस यश मिळाले आरोपीविरुद्ध पो.स्टे. भाग्यनगर येथे गुन्हा दाखल
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
14 days
सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 20 आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांअंतर्गत कारवाई. भाग्यनगर 9 • शिवाजीनगर 4 • वजीराबाद 1 • विमानतळ 2 • दामिनी पथक 4 #CityStreetSafety #SafeStreetsNanded #NandedPolice
0
0
2
@NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police
17 days
ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मुदखेड व उस्माननगर परिसरातील गैरकायदेशीर खनिज विक्रीवर कारवाई. 4 हायवा, 4 पोकलंड मशीन आणि 40 ब्रास अवैध रेती असा एकूण 2 कोटी 87 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त. संयुक्त मोहिमेत 16 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. #NandedPolice #OperationFlushOut #PoliceAction
0
0
1