
DARK
@DARK_5757
Followers
739
Following
4K
Media
174
Statuses
4K
ऐश्वर्याला,मोहित स्वप्नांना दिलेली तिलांजली.निसटल्याचा आभास,निराशेची मळभ,तुटता आत्मविश्वास.देखणेपणाच्या सुखी ऐश्वर्याची आस उरी बाळगलेला एक कुरूप जोकर.🤡 🖤
Joined January 2024
बाप... गरिबी तशी पाचवीलाच पुंजलेली.अशिक्षित जोडपं बाप दारूच्या गुत्त्यावर काम करायचा आई लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची.मुलाच्या हव्यासापायी एक एक करत तीन मुली होऊन दिल्या अन चौथा मुलगा झाला.दारूच्या गुत्यावरच्या वादात कोयत्याने वार केले गेले बापावर गावगुंडांनी.👇
22
45
482
गांधींना दिल्या जाणाऱ्या शिव्या पहाता गांधी न वाचलेल्या या ताज्या पिढीला गांधी न सांगितलेलाच बरा..गांधी वाचनं जेवढा सहज;गांधी हा विचार आचरणात आणण तेवढाच अवघड..बाकी गांधी जयंतीच्या शुभेच्छा..गांधींना शिव्या देऊ शकता कारण तुम्ही गांधींच्या देशात रहाता. #GandhiJayanti #गांधीजयंती
59
127
902
चंचल मनाला स्थिरतेसाठी व्यक्तीच्या ओंजळीची गरज पडू नये.नश्वर जीवाला उगाच किंमत येऊ लागते... #DARK🖤
0
4
17
प्रत्येक पावलांवर दुःखच जिंकणार आहे हे माहीत असूनही चालत जाणारी वाट म्हणजे आयुष्य..मनाला कुंपण घालणं थोडं कमी केलं पाहिजे.माणुस जेवढा कोशात राहील तेवढा हा प्रवास खडतर. क्षणभर सुखासाठी ची ही पायपीट अंतिम श्वासापर्यंत थांबायची नाही... #DARK🖤
0
9
41
शब्दांचं विष होऊ लागलं की नात्याचा मृत्यू काहीशा पावलांवर आहे समजून जावं... #DARK🖤
0
3
13
खोटी आश्वासन देऊ वाटत नाही कधी कधी.पण आपल्या व्यक्तीचे आस लागुन राहिलेले डोळे पाहिले की ओघानं घडत अस. #DARK🖤
0
2
16
नात फक्त सोबतीनं थोडी खुलत ते खुलत जेव्हा आपला माणुस छोट्या छोट्या गोष्टी notice करू लागतो.नजरेचा इशारा नजरेतच बोलका होतो ओठांतुन व्यक्त होण्याची वेळ येऊ लागली की भावनांचा ओलावा कुठेतरी पुसटसा होऊ लागतो... #DARK🖤
0
2
15
पुरुषाच्या काळजाला सहज कळावी एवढी बाई ची व्यथा उथळ नाही..🔥 - फुलवंती ✍️
1
14
80
आरोप प्रत्यारोप ही सुरू होतील.कधीतरी आपत्तीत अडकलेल्यांना माणसं समजावं या व्यवस्थेने..या संकटातून उभं रहायला ताकत मिळावी सगळ्यांना... #DARK🖤 #मराठवाडा #बीड #ओला_दुष्काळ
0
0
1
मराठवाडा अन काही भागातली भयावह दृश्य समोर येतायत.कोणाची शेती,घर,जनावर वाहून गेलीयेत.माणसं गेलीत,संसार उघड्यावर पडलेत,खान्या पिण्याचे हाल,लेकरांचे हाल.घर गेलं आणि मुलांची वह्या पुस्तक वाहून जाताना पाहून धाय मोकलून रडणारी आई दिसली.सरकारी मदत पंचनाम्यात अडकून पडून राहील,
1
0
6
काही आपल्यांनी दिलेली वागणुक माणसाला स्वतःच्या अस्तित्वाच रिकामेपण अधोरेखित करून जाते.अन या मतलबाच्या शिंतोडयांचे व्रण आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात तसेच ठेवायचे असतात.अगदी सुगंधी अत्तराच्या कुपिसारखी.ही लोक परतली की त्यांना ही या सुगंधात न्हाऊन निघण्याच सौभाग्य मिळायला हव.😊 #DARK🖤
0
6
23
मनाच्या वादळाला शांत करण्याला सावलीला आलेले काही वाटसरू.उन्हाची तिरीप डोळ्यांवर आली की झाडाला बोल लावतात..आधार हा कायमच उपकाराच्या तराजुत तोलला जातो.. #DARK🖤
0
2
22
शेवटची भेट..अजरामर कलाकृतीसारखी मनात तशीच राहिली.मिठीतला सुगंध आजही आहे सोबती..हरवलं फक्त नात..उन्हाने सावलीची आस सोडली जगणं आडवं आलं कदाचित. परिसाच्या स्पर्शाने सोन व्हायचं होत पण साल पारिस स्पर्शाची आस राहिली अन दगड आला नशिबी... #इंस्टा #DARK🖤
4
18
120
मृत जगण्याला प्राण फुंकण्याचा तो अपयशी प्रयत्न ज्याची सुरुवात ही मृत्यु अन त्याचा शेवटही मृत्यूच.... #DARK🖤
0
0
0
बेचिराख होत चाललेल्या जगण्याच्या मुळाशी एक शांत व्यक्ती बसलेला असतो.फक्त न्याहाळत असतो परिस्थितीला जी की केव्हाच त्याच्या हातून सुटलेली असते.जे घडतंय मनाविरुद्ध त्याला थांबवणं त्याच्या हाती नसतंच. तो फक्त त्या मृत भावनेला सहन करत असतो.
1
0
10
सोडवत नसलेल्या गोष्टींचा आणि नात्यांचा माणसाला सगळ्यात जास्त त्रास होतो.जीव ही सगळ्यात जास्ती त्याच नात्यात लागतो जे नात काहीशा पावलानंतर दिशा बदलते... #DARK🖤
0
1
20
एका वयानंतर आलेलं शहाणपण जबाबदारीच्या ओझ्याखाली कायमच घुसमटत राहिलंय... #DARK🖤
0
3
23
मनाचा पसारा सावरता आला नाही की ती घर आवरायला घेते... एवढी सोपी असते... ती .. ...ईश्वरी✍️
0
0
2
जगान दिलेलं उपरेपण ग्लासाच्या सावलीत विसरायला ही हल्ली मैफिलीचा रंग विसरून एकटेपणाचा गंध आपलासा करावा लागतो... #DARK🖤
1
2
23
किनाऱ्याच्या अपेक्षेवर लाटांवर स्वार झालेली नौका कायमच भरकटत आलीय.किनाऱ्याच्या ओढीत चापूवर लक्ष नाही गेलं की दुःखाच्या सागराशी अनाभित होती कळेपर्यंत सगळंच संपलं होत... #DARK🖤
0
1
10