sandeshmule Profile Banner
संदेश 🇮🇳 Profile
संदेश 🇮🇳

@sandeshmule

Followers
738
Following
15K
Media
175
Statuses
2K

स्वयंघोषित कवी, अनंतकाळाचा प्रवासी, इतिहास प्रेमी, हौशी वाचक, युट्यूबर आणि स्वतःच्या अस्ताव्यस्ततेला आवरण्यात मग्न एक आनंदी आदिम (माणुस होण्यासाठी प्रयत्नशील).

सोलापूर, महाराष्ट्र संघराज्य
Joined November 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
पुस्तकं वाचण्याचे काही फायदे पुढे देत आहे, १. ज्ञानवृद्धी: खरंतर पुस्तकं ही माहितीचा खजिनाच असतात, वाचनामुळं आपल्याला नवनवीन गोष्टी अवगत होतात ज्यामुळं आपल्याला नवे मार्ग तरी मिळतात किंवा प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तरी बदलतो. #LetsReadIndia #वाचन #पुस्तक 1/n
4
12
38
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
डोक्याला नवा खुराक मिळाला. #LetsReadIndia #पुस्तक
0
2
7
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
@zerodhaonline Please look into it.
1
0
0
@LetsReadIndia
Let's Read India
2 years
मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या सर्वांचा आवडता उपक्रम #अभिवाचन २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सामूहिक भाग घेवू शकता. सर्वानी नक्की सहभाग घ्या आणि इतरांनाही करून घ्या . अभिवाचनाचे ऑडिओ / व्हिडिओ #LetsReadIndia ला टॅग करा. काही चांगल्या
1
46
131
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
"आज लाभले सखी सौख्य जे मला हवे" असं गाणं मोठ्यानं गावं अस वाटतंय, कारण बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली आणि आज हे मिळालं. #पुस्तकंआणिबरचकाही #वाचन
6
7
45
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
आद्य नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल एक समृद्ध मराठी नाटककार होते ज्यांनी परिवर्तनाच्या काळात मराठी रंगभूमीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.त्यांच्या कृतींनी केवळ मनोरंजनच केलं नाही तर सामाजिक जाणीवा सुधारण्यातही त्यांचे मोठं योगदान दिलं आहे. वाचते व्हा, शुभेच्छा! १०/१०
0
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
त्यांचं १४ जून १९१६ रोजी निधन झालं, त्यांनी एक समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा मागे ठेवला. ९/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
वारसा: नाट्याचार्य देवल त्यांनी त्यांच्या साहित्य आणि सामाजिक सुधारणा या दोन्हींतील त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या काळातील सांस्कृतिक आणि बौद्धिक पार्श्वभूमीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे स्थान मजबूत होतं. ८/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
साहित्य व सांस्कृतिक प्रभाव: त्यांच्या कलाकृतींनी मराठी साहित्य आणि रंगभूमीवर कायमचा प्रभाव टाकला. त्यांची नाटकं केवळ मनोरंजकच नव्हे तर सामाजिक संदेश आणि परिवर्तनाचा पुरस्कार करणारी सुद्धा होती,त्याच काळात ते सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्ट्या एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व बनले. ७/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
सामाजिक सुधारणा: त्यांच्या नाट्य योगदानाव्यतिरिक्त, इतरही सामाजिक सुधारणा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग होता. त्यांनी त्यांच्या नाटकांचा उपयोग महिलांची स्थिती आणि जातीय विषमतेसह सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यावर टीका करण्यासाठी एक माध्यम म्हणून केला. ६/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
विशेषतः समाजातील स्त्रियांच्या स्थितीवर भाष्य करतं. हे नाटक सामाजिक भाष्य आणि सामाजिक सुधारणांबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर त्याचा प्रभाव यासाठी प्रसिद्ध होते. सोबतच मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ या नाटकांना देखील मराठीत मानाचं स्थान आहे. ५/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). उल्लेखनीय नाटकं: त्यांचं सर्वात प्रसिद्ध नाटक म्हणजे "संगीत शारदा" हे त्या काळातील सामाजिक समस्या, ४/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
मराठी रंगभूमीवरील योगदान: १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण योगदानासाठी देवल प्रसिद्ध होते. ते एक प्रख्यात नाटककार होते आणि त्यांनी अनेक सामाजिकदृष्ट्या विचार करायला लावणारी नाटकं लिहिली जशी, ३/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ चा कोकणातला. त्यांचं शिक्षण बेळगावात झालं सोबतच त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत भूमिका आणि दिग्दर्शन करायला सुरुवात केली. २/n
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल( १८५५-१९१६) यांचा आज जन्मदिवस ते एक आद्य #मराठी नाटककार होते त्यांच्याविषयीच काही संक्षिप्त गोष्टी या #थ्रेड मध्ये जाणून घेऊयात: #माहितीपूर्ण #म १/n
1
1
2
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
इथं येवून आज १३ वर्ष झाली, X(ट्विटर) ने खूप दिलंय, खूप माणसं जोडलीत, हा प्रवास असाच सुरू राहावा. #MyXAnniversary
0
0
1
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
वाचते व्हा, शुभेच्छा!! तळटीप: कृष्णधवल चित्र विकिपीडिया वरून साभार.
0
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
पुलं खरे बहुआयामी होते, त्यांची प्रतिभा विविध कला प्रकारांमध्ये पसरलेली होतीच त्यांचबरोबर विनोदी शैली, मराठी साहित्यात आणि त्याहूनही पुढे सांस्कृतिक समृद्धीचा अढळ ध्रुवतारा म्हणून टिकून राहील. जगाला हसवणारी आणि विचार करायला लावणारी लाडकी व्यक्तिरेखा म्हणून ते सदैव स्मरणात राहतील.
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
वैयक्तिक स्नेह: पु लं त्यांच्या साहित्यिक आणि व्यावसायिक कामगिरीच्या पलीकडे, त्यांच्या निखळ आणि लाघवी व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जात असत. समाजजीवनाच्या सर्व स्तरातील लोकांशी त्यांची जोडली जाण्याची आणि त्यांना आपलंसं करण्याची अद्वितीय क्षमता त्यांच्याकडे होती.
1
0
1
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
पुरस्कार आणि लोकमान्यता: पु लं ना त्यांच्या साहित्यसंस्कृतीतील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, ज्यात भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण या पुरस्कारांचा सुद्धा समावेश आहे.
1
0
0
@sandeshmule
संदेश 🇮🇳
2 years
वारसा: पु लं चं कार्य आजही मराठी भाषिक लोकांकडून आजही सोहळ्यासारखं साजरं केलं जातं. त्यांचं लेखन आजही तितक्याच आवडीनं वाचलं जातं आणि त्यांची नाटके महाराष्ट्रभरातील तमाम सांगभूमीवर सादर होतात. त्याचा वारसा त्यांचे विनोद जो पिढ्यांपिढयांना आनंद देत राहतील.
1
0
0